ड्रीम वर्ल्ड मार्शल आर्ट ट्रेनिंग यांच्यावतीने 5 th खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेत कम्प्लीट कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन प्रथम क्रमांकावर आपले नाव शिक्कामोर्तब केले.
सदर कार्यक्रम कोप्पळ येथील गंगावती हॉलमध्ये सहा आणि सात मे रोजी पार पडला. यावेळी या स्पर्धेत भारतातून जवळपास बाराशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कराटे संघटनेचे अकेले कर्नाटका सपोर्ट सराटी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी भार्गव रेड्डी व जब्बी वल्ला उपस्थित होते.
यावेळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे चषक प्राप्त केलेले कराटे मास्टर जितेंद्र काकतीकर व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना कराटे मास्तर जितेंद्र काकतीकर रमेश अलगुडेकर अक्षय प्रभुजी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.