बंटर संघाचा ३८ वा वर्धापन दिन दि.८ मे रोजी दुपारी चार वाजता बंटर भवन येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण शेट्टी,सेक्रेटरी चेतन शेट्टी,स्वागत समिती अध्यक्ष प्रभाकर शेट्टी,खजिनदार चेतन शेट्टी उपस्थित होते.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने यक्षगान राग वैभव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्या नंतर विशेष प्राविण्
मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.समाजातील मान्यवरांचा देखील त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सत्कार करण्यात येणार आहे.सांस्कृतिक कार्यक्रम देखील वर्धापन दिनाचे आकर्षण ठरणार आहे.सहभोजनाने वर्धापन दिनाची सांगता होणार आहे अशी माहिती चंद्रशेखर शेट्टी यांनी दिली.