राजर्षी शाहू महाराजाना सांबऱ्यात अभिवादन
सांबरा :
लाल मातीच्या कुस्तीला प्रोत्साहन देणारे लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्ताने सांबरा कुस्ती कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करण्यात आले.
साई जिमच्या आवारात राजर्षी छ. शाहू महाराज अभिवादान करण्यात आले. राजर्षी शाहू महाराजांनी लाल मातीच्या कुस्तीला राजाश्रय दिला. तालीम आणि आखाडे बांधले. तसेच मल्लांना प्रोत्साहन देवून कुस्तीला बळकटी दिली.
त्यांच्या या कार्याला वंदन म्हणून शाहू स्मृती शताब्दी पर्व साजरे केले जात आहे. त्यातील स्तब्धता म्हणजे एक अनोखे वंदन आहे, असे विचार यल्लाप्पा हरजी यांनी मांडले. लक्ष्मण सुळेभावी, भरमा चिंगळी, कृष्णा जोई, मोहन हरजी, शिवाजी मालाई, भुजंग धर्मोजी, यल्लाप्पा जोगानी, सिद्राई जाधव, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, शितलकुमार तिप्पान्नाचे, महेंद्र गोठे, नितिन चिंगळी, प्रवीण ताडे ,अनिल कडेमनी, विनायक चिंगळी, अप्पानी यड्डी, मोहन शंकर हरजी, कल्लाप्पा चिंगळी, ओमकार चौगले, प्रकाश खनगावकर, रोहित चिंगळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.