मुस्लिम बांधवांचा पवित्र असलेला रमजान चा सण शहरात मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांनी साजरा केला. यावेळेळी सोमवारी रात्री ईदचा चांद दिसल्यानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वजण सकाळी नमाज अदा करण्यासाठी मशिदीजवळ जाऊन नमाज अदा केली. त्यानंतर सर्वानी एकमेकांची गळाभेट घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
गेल्या महिन्याभरात पूर्वी मुस्लिम बांधव रमजान चा उपवास केला होता . या रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव गरजूंना अनुदानाचे वितरण करतात किंवा एखाद्याला मदत करून रमजान ईदचे पवित्र्य राखतात.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने मुस्लिम बांधवांना रमजान ईद साजरी केली नव्हती. मात्र आता दोन वर्षानंतर कोरोनाचे संकट कमी झाल्याने सर्व मुस्लिम बांधवांना एकत्र येत रमजान ईद साजरी करत आहेत.
येथील अंजुमन इस्लाम च्या मैदानावर आज सकाळपासून मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी सर्वांनी सामूहिक नमाज पठण करत एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हा सण उत्साहात साजरा केला.