कंग्राळी बुद्रुक येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिवजयंतीनिमित्त गावांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते सौरभ कराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र आणि अफजलखानाचा व याविषयी सांगून सर्व शिवप्रेमींना प्रेरित केले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तसेच महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आरती करून व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी व्याख्याना प्रसंगी सौरभ करडे म्हणाले की ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना घडवले त्याचप्रमाणे आजच्या माता ने देखील आपल्या मुलांना घडविणे गरजेचे आहे.
याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी लढले.. तोच वसा आता पुढे चालवत आपल्याला देखील हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची गरज आहे. सर्वच ठिकाणी हिंदुत्व आपल्याला निर्माण करायचा असल्याचे मत यावेळी व्याख्यानांमध्ये मांडले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपद मल्लाप्पा पाटील यांनी भूषविले. या शिवचरित्र कार्यक्रमाला आणि व्याख्यानाला ग्रामपंचायत अध्यक्ष संध्या चौगुले अनिल पावशे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष वकील सुधीर चव्हाण मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार तुकाराम बँकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे प्रदीप अष्टेकर यांच्यासह शिवप्रेमी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.