17 जुलै 2019 रोजी गोकाक येथील महांतेश नगर मध्ये खून झालेल्या युवकाचा प्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे. या तरुणाच्या खुनाच्या बाबतीत दररोज नवनवे दावे करण्यात येत असून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी काल प्रसारमाध्यमांसमोर हंबरडा फोडत आपल्या मुलाचा खून बबली कुटुंबीयांनी केल्याचा आरोप केला आहे.
काल यासंदर्भात मंजू अरकभावी या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी अनेकांचा हात असल्याचा दावा केला आहे. तसेच आपल्या मुलाला न्याय मिळवून द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ केले आहे. याचबरोबर प्रसारमाध्यमांनी समोर देखील पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
यावेळी आपल्याकडून टप्प्याटप्प्याने 15 लाखांची लाच गोकाक सिपीआय आणि कर्मचाऱ्यांनी घेतली आहे असे बबली कुटुंबीयांनी सांगितले .तसेच मुरकभावी कुटुंबीयांनी बबली कुटुंबीयांवर आपल्या मुलाचा खून केल्याचा आरोप केला आहे .
तसेच सदर प्रकरण दडपण्यासाठी आम्हाला पैसे देऊन हे प्रकरण बंद करावे असे देखील सांगितले .मात्र आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी मुरकभावी कुटुंबियांनी केली आहे.