उद्यापासून इंडोनेशियामध्ये पाम तेलाचा निर्यातीवर बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे याचा परिणाम स्वाभाविकच भारतावर होणार आहे. यापूर्वीच देशातील खाद्यपदार्थाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या मात्र आता इंडोनेशिया मध्ये देखील तेलाच्या निर्यातीवर बंदी आणल्याने याचा थेट परिणाम भारतावर सर्वाधिक होणार आहे.
तसेच भारतीयांना आता आपल्या खिशाला कात्री लावावी लागणार आहे. भारत निम्म्याहून अधिक पाम तेल इंडोनेशिया कडून खरेदी करतो . मात्र आता इंडोनेशिया मधूनच पाम तेलाची निर्यात बंद करण्यात आली आहे.
भारत जवळपास नऊ दशलक्ष टन पामतेल खरेदी करतो यातील 70 टक्के पामतेल इंडोनेशिया मधून आयात केले जाते. तर उर्वरित पामतेल अन्य ठिकाणी होऊन निर्यात केला जातो
यातील पन्नास टक्के तेल घरगुती उत्पादनांमध्ये वापरला जातो. भारतीय महिला तेलाचा जास्त उपयोग स्वयंपाकामध्ये करतात. तसेच फॅक्टरी मध्ये शाम्पू आंघोळीचे साबण टूथपेस्ट विटामिन गोळ्या कॉस्मेटिक उत्पादने केक आणि चॉकलेटमध्ये यामध्ये देखील तेलाचा वापर केला जातो.
सध्या इंडोनेशियाच्या देशांतर्गत बाजारपेठेत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या किमतीत सुमारे 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातच यूक्रेन युद्धामुळे सूर्यफूल आणि सोयाबीन तेल आदेश दबावाखाली आहेत. आता इंडोनेशिया मध्ये देखील पामतेल यावर बंदी आल्याने याचे मोठे गंभीर परिणाम भारतावर होणार आहेत.