शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ही भटके कुत्रे अन्नाच्या शोधात इतरत्र भटकत असून रात्रीच्या अंधारात अनेकांचा चावा देखील घेत आहे.कंग्राळ गल्ली मध्ये एका पाच वर्षीय बालकाचा चार कुत्र्यांनी अशाचप्रकारे चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केले.
सध्या बालक गंभीर अवस्थेत जखमी असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. कंग्राळ गल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे या भटक्या कुत्र्यांची संख्या कमी व्हावी आणि त्यांची नसबंदी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश अशोक काळे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. भटक्या कुत्र्या मुळे नागरिकांना होत असलेला त्रास कमी व्हावा याकरिता येथील भटक्या कुत्र्यांना रेबीज इंजेक्शन द्यावे अथवा त्यांची नसबंदी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सदर मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले असून त्याची आणखीन एक प्रत महानगर पालिकेच्या आयुक्तांना देखील दिली आहे.