बेळगाव उत्तर मतदार क्षेत्रात आमदार अनिल बेनके पुरस्कृत महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आई बापाची लाडाची लेक या कार्यक्रमांतर्गत महिलांना सबलीकरण आणि एकत्रित करण्याचा उद्देश आमदार अनिल बेनके यांच्या असल्याने त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाची सुरवात राज माता जिजाऊ,भारत माता,कित्तुर राणी चन्नम्मा,यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना अनेक खेळ खेळविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात रिंग खेळ बलून खेळ लिंबू चमचा खेळ यासारखे वेगवेगळी मनोरंजनात्मक खेळ असणार आहेत. शिवाय शारीरिक आणि बौद्धिक खेळाचे नियोजनही करण्यात आले असून विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत
याकार्यक्रमा वेळी प्रत्येक वार्डातील 10 महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले .
सदर कार्यक्रम चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये पार पडणार असून यासाठी इच्छुक महिलांनी आपले नावे द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी संगीता घाटकर 9663638660 त्या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.