पत्नी घराबाहेर पडतात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे
सदर घटना उचगाव रवळनाथ गल्ली मध्ये घडली असून सदर युवकाचे नाव मंथन राजू जाधव वय 25 असे आहे.
त्यांनी आपल्या राहत्या घरी बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंथन ने आत्महत्या का आणि कशासाठी केली हे अद्याप समजू शकले नसले तरी पोलिस अधिक तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच काकती पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा रुग्णालयात पाठविला तसेच आज दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटनेची नोंद काकती पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.