शहरात आज राज्य सहकारी संघाच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाला सहकार मंत्री एसटी सोमशेखर उपस्थित होते .यावेळी त्यांनी या उद्घाटन कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ते म्हणाले की सहकार क्षेत्र आता फोफावत चालले असून अलीकडच्या काळात सहकार संस्था स्वतःच्या इमारतीत स्वतंत्र कारभार करत आहेत ही आनंदाची बाब असून नागरिकांच्या विश्वासामुळे सहकार संस्था पुढे आली असल्याचे सांगितले.
अलीकडच्या काळात अनेक सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत मात्र नागरिकांच्या ठेवी या सुरक्षित असून रिझर्व बँक या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यास पुढाकार घेत असल्याचे प्रतिपादन यावेळी केले .तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या सहकार संघाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला रेड्डी यांचा मोलाचा वाटा असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी विचारलेल्या प्रश्नांची सहकार क्षेत्रासंबंधी सहकार मंत्री एसटी सोमशेखर यांनी उत्तरे दिली. तसेच सहकार क्षेत्राने कशाप्रकारे पुढे आले पाहिजे आणि नागरिकांनी सहकार क्षेत्रावर विश्वास टिकून ठेवला पाहिजे हे सांगितले .