आज जेल विंग येथे एक घुबड जखमी अवस्थेत सापडले. यावेळी येथील गगनदीप बावा यांनी फेसबुक फ्रेंड सर्कल च्या सदस्यांना याबाबत माहिती दिली.
यावेळी तात्काळ फेसबुक फ्रेंड सर्कल चे अवधूत तुडयेकर हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी घुबडाला उचलून उपचाराकरिता वनविभागाकडे सुपूर्द केले.
यावेळी वनविभागाचे विनय गौडर यांनी तात्काळ मदतीला धावून आल्याबद्दल आणि जखमी बुडाला वेळेवर उपचार मिळावे याबद्दल मदत केल्याबद्दल अवधूत तुडयेकर यांचे आभार मानले