चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस उलटले तरी दाक्षिणात्य चित्रपट असलेला आर आर आरने चित्रपटगृहात तुफान घातला आहे यामुळे अार अारआर हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर केला असून या चित्रपटाने आपली भरघोस कमाई सुरू ठेवली आहे.
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून जवळपास एक हजार कोटी क्लब मध्ये त्यांनी जागा मिळवली आहे. या चित्रपटातील प्रमुख अभिनेता असलेल्या ज्युनिअर एनटीआर यांनी हनुमान दीक्षा घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे ते पुढील एकवीस दिवस अनवाणी राहणार आहेत.जूनियर एनटीआर हनुमान दीक्षा घेतल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये त्यांनी भगव्या कुर्त्याचा पायजामा घालून गळ्यात माळ आणि माथ्यावर टिळा लावला आहे.
तरार मधील दुसऱ्या अभिनेते रामचरण यांनीही काही दिवसांपूर्वी अयाप्पा दिक्षा घेतल्याची बातमी मिळाली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत या दोन सुपरस्टार ने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत मात्र त्यांचा आर आर आर हा चित्रपट तुफान गर्दी चालू आहे तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे.