*चंदगडी नाट्य महोत्सव*
*दिवस सातवा*
🎭🎤🎹🎼🎭🎼🎤
*रजोनिवृतीमुळे स्त्री मनाची अस्वस्थता ही कौटुंबिक स्वास्थ बिघडते यावर बेस्ट उपाय ‘पॉज’ या नाट्यकलाकृतीने रसिकांना भुरळ*
🎭🎤🎭🎼🎹🎭
प्रोसेस इन थिएटर व श्री साई नाट्यधारा मंडळ चंदगड ने सध्यस्थितीत आजच्या वास्तवातील कौटुंबिक स्वास्थ आनंदीत राहण्यासाठी आधारित *पॉज* ‘ह्या नाटकांची निर्मिती केली .
*चंदगडकरांना चंदगडी नाट्य महोत्सव पर्वणीच!*
*नाट्य रसिकांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव !*
🙏🙏 *पॉज*🙏🙏
*कौटुंबिक स्वास्थ लाभण्यासाठी स्वतः च्या वागण्यात बदल म्हणजे एक ‘पॉज’..!*
*जीवनाला कलाटणी मिळेल*
” स्त्री मनाची ठराविक वयात होणारी मानसिक बदल अन् या बदलाना समजावून घेवून आपल्याच वागण्यात बदल करणं हे आजच्या वास्तववादी कौटुंबिक जीवनात रहस्य … ! एक भावनिक व हृदयस्पर्शी कलाकृती म्हणजे ‘पॉज ‘…!
*रजोनिवृत्ती (मेनोपॉज)* म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे. सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी स्त्रीला मेनोपॉज येऊ शकतो. पाळी बंद होण्याआधी काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात त्या दृष्टीने काही बदल घडायला सुरुवात होते.
45 शी नंतर स्त्रिच्या मासिक फाळी बंद होवून हार्मोन्समुळे शारिरीक बदल व मानसिक बदल होतात .कधी खूप आनंदी वाटणं, तर कधी खूप दुःखी, रडण्याचे झटके येणं, चिडचिड वाढणं, स्मरणशक्ती कमी होणं, नैराश्य आणि उदासिनता, आत्मविश्वास कमी होणं ,हट्टीपणा , चिडचीड , हेकेखोरपणा , राग-रुसवा अन् यातून होणारी नवरा- बायकोची कधी शाब्दिक चकमक होत होत एक दिवस भांडण …मग घरातलं कौटुंबिक स्वास्थ बिघडतं ते केवळ यामुळेच ! समोरच्या व्यक्तीला जर ही बदलाची कारणंच माहिती नसतील तर मग मान-अपमान वाटून कौटुंबिक कलह दिवसेंदिवस वाढत जातो . वेळीच ओळखून आपणच वागण्यात बदललो तर अन् तरच पुन्हा कौंटुंबिक स्वास्थ लाभतं.
घरात वातावरण बिघडू द्यायचं नसेल तर आपल्याच वागण्यात बदल केला पाहिजे. याच एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘पॉज ‘ एकांकीका आहे.
इथं एकच सांगावंसं वाटतं, की माझ्या प्रिय मैत्रिणींनो, हा मेनोपॉजचा काळ आहे आणि तो कायम राहणार नाही. या बदलाला प्रसन्नतेनं सामोरं जायचं आहे. मानसिकता बिघडत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. *हा आजार नसून, शारीरिक बदलाचा एक काळ आहे*. सकारात्मक विचारसरणीनं त्याला सामोरं गेलं, तर त्रास कमी होईल. त्यासाठी आपल्या आहार आणि विहारामध्ये बदल करायलाच हवा.
जेंव्हा ती मागते -चिडते,वाद निर्माण होता .तेंव्हा रागाच्याभरात पुरुषाचा कॉलर पकडते. निःशब्द हे तो पाहतो . . .अन् विचार करून आपणचं आपलं वागणं बदललं पाहिजे. हा त्याचा सद्सदविवेक बुद्धीने घेतलेला निर्णय कौटुंबिक स्वास्थ व आनंद देतो . हेच या ‘पॉज ‘ मधून अभिप्रेत आहे .
आजच्या संवेदनशील मनाला या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणं आणि निभावणं अहंकारी पुरुष जाती समोरआवाहन आहे . स्विकारणं … वागण्यात बदल करणं आणि आनंदित राहणं हेच प्रयोजन ‘पॉज ‘ मुळे मिळालं .
अगदी सहज सोपा नाट्य रूपाने कला सादर करून रसिकांची मने जिंकली ती माझे स्नेही नाट्यवेड्या परशू गावडेतल्या दडलेल्या नाट्यकला गुणाचा हा अविष्कार आहेच .. !
*प्रोसेस इन थिएटर आणि साई नाटय धारा , चंदगड*
*पॉज*
लेखक- प्रशांत जोशी
दिग्दर्शक- प्रा.परसू गावडे
पार्श्वसंगीत-सुमेध उन्हाळेकर
प्रकाशयोजना – श्याम चव्हाण , स्वप्नील आगवेकर
नेपथ्य- विजय मोरे, दिलीप गावडे
कलाकार – राहुल गावडे , आत्माराम पाटील , वैशाली पाटील आणि परसू गावडे
रंगभूषा वेशभूषा- प्रा. गीतांजली पाटील
*मेड फॉर इच ऑदर*
लेखक- प्रल्हाद कुरतडकर
दिग्दर्शक- प्रा.परसू गावडे
पार्श्वसंगीत-सुमेध उन्हाळेकर, शृंखला जोशी,
प्रकाशयोजना – श्याम चव्हाण , स्वप्नील आगवेकर
नेपथ्य- विजय मोरे, दिलीप गावडे आणि आरपीडी महाविद्यालय कल्चरल असोसिएशन बेळगाव
कलाकार – राहुल गावडे , आत्माराम पाटील , वैशाली पाटील आणि परसू गावडे
रंगभूषा वेशभूषा- प्रा. गीतांजली पाटील,
🙏🙏या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन ..!🌹🌹
✍️ *सीमाकवी रवींद्र पाटील* (कुद्रेमानी )
राज्याध्यक्ष
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्य (बेळगाव )