क्रीडाभारतीतर्फे स्थापनादिन व हनुमान जयंती साजरी.
बेळगाव दिनांक 16 गुड्शेडरोड वरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातील सभागृहात क्रीडाभारती बेळगाव जिल्हा यांच्यावतीने क्रीडाभारती स्थापना दिवस व हनुमान जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे क्रीडाभारती राज्याध्यक्ष मुकुंद किल्लेकर, क्रीडाभारती बेळगाव जिल्हा संयोजक विश्वास पवार, प्रशिक्षक संजीव नाईक,व्ही एस पाटील, अँड धामणकर, उमेश बेळगुंदकर, परशुराम मंगनाईक, विद्याभारती बेळगाव जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील,ल
या मनोज कावळेकर ,सुरज पाटील या मान्यवरांच्या हस्ते हनुमानपूजन, भारतमाता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले,यानंतर उपस्थित खेळाडूंनी ओमकार भिमरूपी हनुमान चालीसा, गायले याप्रसंगी क्रीडाभारती जिल्हा संयोजक विश्वास पवार यांनी क्रीडाभारती बद्दल सविस्तर माहिती दिली व बेळगाव जिल्ह्यातील क्रिडाभारतीच्या कार्याचा आढावा घेतला, याप्रसंगी खेळाडू टिना वानखेडे ,अपूर्वा नाईक, वैभवी बुद्रुक, वैष्णवी बुद्रुक ,ऐश्वर्याने नेसरकर, स्मिता काकतकर ,धनश्री पाटील, अमृता काजरेकर, अरुण माळवी, भुषण पाटील, लक्ष्मण पाटील ,अनिकेत पाटील ,यश पाटील व क्रीडाभारतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील तर विश्वास पवार यांनी आभार मानले.