कोरोना काळात हजारो कोटींचा भ्रष्टाचार भाजपने केला आहे. त्यामुळे अनेकांचा भाजप सरकारला लागलास भाजप सरकारने केलेल्या भ्रष्टाचारामुळे मंत्री हलाल होत आहेत.
याची सुरुवात मंत्री ईश्वराप्पा यांच्यापासून झाली असून आता त्यांचा भ्रष्टाचारामुळे भाजप मधील सर्व नेत्यांचा बळी जाणार आहे.अशी कडक टीका केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आज पत्रकारांसमोर केली.
भाजप सरकार सर्वांकडून 40% कमिशन घेत आहे. या भ्रष्टाचाराला कंटाळून कन्नड धरण संतोष पाटील यांनी आत्महत्या केली आहे तसेच त्यांनी ईश्वरप्पा यांच्यावर आरोप करून चिट्टी लिहिली आहे. त्यामुळे मंत्री ईश्वराप्पा यांना अटक होईपर्यंत काँग्रेस आंदोलन सुरूच ठेवेल असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले