बेळगाव: जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन ) या सेवाभावी संस्थेचे नुतन अध्यक्ष श्री शिवकुमार हिरेमठ व सहकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ रविवार दिनांक 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे ,डॉ. एस पी एम रोडवरील शीवम हॉल येथे संध्याकाळी 5/30 वा.
संपन्न होणार आहे , या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री अभय पाटील तसेच जायंट्स फेडरेशनच्या अध्यक्षा तारादेवी वाली व जायंट्स स्पेशल कमिटी सदस्य श्री मोहन कारेकर उपस्थित राहतील यावेळी युनिट डायरेक्टर मदन बामणे हे अधिकार ग्रहणाची शपथ देतील नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष सुनील मुतगेकर व अविनाश पाटील सेक्रेटरी मुकुंद महागांवकर खजिनदार यल्लाप्पा पाटील संचालक मंडळ श्री विश्वास पवार ,एस सुरेश, सुनील चौगुले, राहुल बेलवलकर, अजित कोकणे, आनंद कुलकर्णी, दिगंबर किल्लेकर, मधु बेळगांवकर ,पांडुरंग पालेकर, पद्मप्रसाद हुली व धीरेंद्र मरिहळ्ळी.
या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष संजय पाटील व सेक्रेटरी विजय बनसुर यांनी केले आहे.
अध्यक्ष
शिवकुमार हिरेमठ
शिवकुमार हिरेमठ हे गेल्या २५ वर्षांपासून जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन चे सदस्य आहेत. या काळात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. व्यवसायाने ते क्लास वन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत. सामाजिक सेवेत ते अग्रेसर असतात.
सेक्रेटरी
मुकुंद महागावकर
मुकूंद महागावकर हे निवृत्त बँक व्यवस्थापक आहेत. लहानपणापासून ते विविध सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. गेले एकतीस वर्षे जायंट्स या सेवाभावी संस्थेशी निगडित आहेत. अनेक संस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.
उपाध्यक्ष
सुनील मुतकेकर
सुनील मुतकेकर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून जायंट्स चे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना जायंट्स चे उत्कृष्ट उपाध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात ते अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.
खजिनदार
यल्लाप्पा गावडू पाटील
यल्लाप्पा पाटील हे बेळगावातील व्यावसायिक आहेत. गेल्या सात वर्षांपासून ते जायंट्स ग्रुप मध्ये कार्यरत आहेत. बसवण्णा महादेव सोसायटीचे माजी व्हा चेअरमन आहेत. कुमारस्वामी ले आऊट रहिवाशी संघाचे खजिनदार आहेत. तसेच विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.