काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना भ्रष्टाचार आणि प्रशासन याबद्दल बोलायचा नैतिक अधिकार नाही.काँग्रेस पक्षाने भ्रष्टाचाराला जन्म दिला आणि वाढवला.भाजप देखील त्याचाच कित्ता गिरवत आहे अशी टीका स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून आप पक्षाचा झेंडा हातात घेतलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी भास्करराव यांनी केली.
स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून आप पक्षात प्रवेश केल्यावर बेळगाव दौऱ्यावर आलेल्या भास्करराव यांनी पत्रकार परिषद घेवून कर्नाटकात आप पक्षाची पाळेमुळे रुजवणार असल्याचे सांगितले.पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षावर दहा टक्के कमिशन मागणारा पक्ष अशी टीका केली होती पण आज कर्नाटकातील एका भाजप मंत्र्याने चाळीस टक्के कमिशन मगितल्यामुळे एका कंत्राटदाराने आत्महत्या केली.त्यामुळे भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सारखेच आहेत.काँग्रेस आणि भाजपच्या भ्रष्टाचार आणि कारभाराला जनता कंटाळली आहे.जनतेला बदल हवा आहे.कर्नाटकात आप पक्षाचा विस्तार करणार आहे.आप पक्षात येण्यास बरेच जन उत्सुक आहेत.तरुणांची हजारोंची फौज आपकडे आहे.बुद्धिजीवी आणि अन्य वर्ग आप सोबत येण्यास उत्सुक आहे.कंत्राटदार संतोष पाटील यांची आत्महत्या होवून चार दिवस उलटले तरी त्या प्रकरणाचा तपास सी आय डी कडे द्यायचा किंवा आणखी कोणाकडे द्यायचा याविषयी सरकारने काहीही भूमिका स्पष्ट केली नाही.संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी संबंधितांना अटक करून न्यायालयात हजर करा अशी मागणी देखील पत्रकार परिषदेत भास्करराव यांनी केली.