प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन स्टार एअर कंपनीने बेळगाव ते नागपूर विमान सेवा आजपासून सुरू केली आहे या सेवेचा शुभारंभ आज एअरपोर्ट डायरेक्टर राजेश कुमार मौर्य यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सदर विमान सेवेला आज पासून प्रारंभ झाल्याने छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रिबन कटिंग दिवाबत्ती आणि केक कटिंग करण्यात आले.
त्याआधी प्रथम प्रवासी म्हणून कुलकर्णी दाम्पत्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी स्टार स्टेशन हेड एचपीसीएल p.s. देसाई टर्मिनल हेड प्रभारी यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.