भारतीय जनता पार्टी महानगर बेळगाव यांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
बेळगाव: भारतीय जनता पार्टी महानगर बेळगाव यांच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रथमथा शहरातील आंबेडकर उद्यान मध्ये सर्व पदाधिकारी जाऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .त्यानंतर सदाशिवनगर येथील पक्षाच्या कार्यालयामध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महानायक यांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके बेळगाव महानगर जिल्हाध्यक्ष श्री शशिकांत आर पाटील, बेळगाव विभाग सह-महासचिव एम.सी.जयप्रकाश जिल्हा सरचिटणीस श्री दादागौडा बिरादार उत्तर मंडळ अध्यक्ष श्री विजया कोडगनूर व इतर प्रमुख देवराजा बस्तवडे, मल्लिकार्जुन सत्तीगेरी, महांतेश वकुंकुंदा, पक्कुराम काकुंदा, , केदारा जोरापुरा , नागराज पाटील , विनायक मदलबावी , शिरोडकर , प्रवीण महेंद्रकर , अनिकेत धसानी व इतर मान्यवरांनी जयंती साजरी केली.