आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवरील डॉ आंबेडकर ऑटोरिक्षा स्थानकाचे उद्घाटन आज करण्यात आले.
प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला उत्तर चे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर येथील आंबेडकर ऑटो रिक्षा स्थानकाचे उद्घाटन आमदारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल बेनके यांनी सर्व रिक्षाचालकांना आंबेडकर जयंती च्या शुभेच्छा दिल्या आणि आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी दलित नेते मल्लेश चौगुले यांच्यासह जय भीम युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि दलित संघटनेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.