भाजप कर्नाटक राज्य ओबीसी सचिव आणि विमल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी कारंजी मठातील श्री गुरु सिद्ध महास्वामीजी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची भेट घेऊन शुभाशीर्वाद घेतले.
यावेळी स्वामींनी लोक सेवेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असलेल्या किरण जाधव यांना त्याचा सल्ला दिला. तसेच आपला आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याचे याप्रसंगी सांगितले.
यावेळी किरण जाधव यांनी आपण करत असलेल्या कार्याची संपूर्ण माहिती स्वामींना दिली. आणि त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
याप्रसंगी सुरेश यादव लक्ष्मण पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते स्वामीजींना पुष्पहार अर्पण करून वाढदिवसानिमित्त शुभ आशीर्वाद घेतले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.