दिनांक 11 एप्रिल ते 17 एप्रिल आठवड्याभरात विविध ठिकाणी आंदोलन करून शेतकरी विश्वास घात सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. या सप्ताहाला 11 एप्रिल पासून सुरुवात होत असून आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडणार असल्याची माहिती शेतकरी नेते सिद्ध गौडा मोदगी यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांचा नवीन एस पी कमीत कमी दर ठरविण्यासाठी केंद्र सरकारकडून तज्ञ समितीची रचना करण्यात यावी. तसेच कर्नाटक सरकारने तयार केलेले तीन कृषी कायदे वापस घ्यावेत त्याशिवाय बेळगाव येथील जय किसान होलसेल भाजी मार्केट ला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी शेतकरी विश्वास घात सप्ताहात करण्यात येणार आहे.
हा शेतकरी विश्वास घात सप्ताहाचे उद्घाटन मैसूर मध्ये करण्यात येणार असून. दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता जुन्या जिल्हा पंचायत कार्यालयात असलेल्या ग्रामीणचे आमदार यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
तर दिनांक 16 एप्रिल रोजी बेळगावचे दक्षिणचे आमदार यांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. तसेच एप्रिल 18 एप्रिल रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून शेतकरी विश्वास घात सप्ताहाची सांगता करणार असून यावेळी आपल्या मागण्यांची पूर्तता देखील शेतकरी करणार आहेत.