देशातील अनेक भागांमध्ये सुरक्षित आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असतानाच एका युवकाने पोर्टेबल वॉटर फिल्टर बनविला आहे. सहज हाताळण्यात जोगे जलशुद्धीकरण उपकरण( वॉटर फिल्टर) त्या युवकाने बनविल्या असून त्याची देशातील सर्वात तरुण संशोधक म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
निरंजन श्रीनिवास कारगी हा बेळगावचा असून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने बेळगाव च्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच बेस्ट लीडर पुरस्कार मिळणारा निरंजन आता पुढील वर्षापर्यंत निर्णय प्रकल्प मोठ्या पातळीवर नेण्याचा विचारात आहे.
निरंजन यांचे माध्यमिक शिक्षण कॅम्प येथील सेंट मेरी स्कूल मध्ये झाले आहे तर पदवीपूर्व अभ्यासक्रम त्याने गोविंदराव सक्सेरिया सायन्स कॉलेजमधून पूर्ण केल्या असून अभियांत्रिकी शिक्षण अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कॉलेजमधून पूर्ण केले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी खर्चिक असलेल्या वॉटर फिल्टर मध्ये क्रांतिकारी बदल झाला पाहिजे तसेच त्यांना कमी दरात याचा उपयोग झाला पाहिजे या हेतूने अत्यंत माफक दरात पोर्टेबल वॉटर फिल्टर ची निर्मिती निरंजने केली असल्याचे त्याने यावेळी सांगितले.
निरंजनने आता वॉटर फिल्टर प्रकल्पाचे यशानंतर हायड्रोजन वेल्डिंग उपकरण तयार केले आहे. उपकरण पाणी आत घेऊन हायड्रोजनची निर्मिती करते जे वेल्डिंग च्या कामात उपयोगी ठरते असे त्यांनी सांगितले. निरंजन ने केलेल्या या उपकरणात बद्दल त्याला निरंजन फाउंडेशन आयोजित युवा समिटमध्ये लीडर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्यांनी तयार केलेल्या वॉटर फिल्टर ची किंमत अवघी वीस रुपये आहे. प्लास्टिक ऍक्टिव्हेट कार्बन कापूस आणि जाळी पासून तयार करण्यात आलेले हे पोर्टेबल वॉटर फिल्टर कोणत्याही पाण्याच्या बाटलीत किंवा नळाला बसू शकते तसेच या वॉटर फिल्टर ची पाणी शुद्ध करण्याची क्षमता पंधराशे लिटर इतकी असल्याचे निरंजन ने सांगितले आहे.