जयश्री मुरगोड यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य मोलाचे : मा. खा. अमरसिंग पाटील –
” शिक्षण सेवारत्न पुरस्काराने सन्मानित ”
बेळगांव : खानापूर तालुक्यातील सरकारी प्राथमिकआणि माध्यमिक शाळा सुधारण्याचा प्रयत्नवेळोवेळी केला जातो. दुर्गम भागातील शाळा आणि शिक्षकांच्यासमस्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या GMLPS हरसनवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री आप्पाण्णा मुरगोड यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा आणि शाळा टिकविण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम घेऊन यशस्वी ही केले आहेत. मराठी शाळेमध्ये मुलांनी शिकून देश विदेशात मजल मारली आहे; इंग्रजीला बळी न पडता मातृभाषेतील घेतलेले शिक्षण कमी पडत नसून भावी आयुष्यात उज्वल वृध्दींगत करणारे आहे हे त्यांनी केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे यासह अनेक मान्यवरांना विविध संस्थांना देण्यात आले आहेत . समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रत्येकांनी योगदानदेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन माजी खासदार अमरसिंग पाटील यांनी केले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादीत, अंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा, बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली चिक्कोडी या ठिकाणी आज रोजी “रंगमंच” दिनाचे औचित्य साधून संपन्न करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीची दखल घेऊन, GMLPS हरसनवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री आप्पाण्णा मुरगोड, यांना “शिक्षण सेवारत्न” पुरस्कार देऊन, मा. केंद्रीयमंत्री रत्नमाला सावनूर, बॅरिस्टर श्री अमरसिंह पाटील मा. खासदार बेळगांव, श्री अरविंद घट्टी मा. जिल्हा कमांडंट कर्नाटक सरकार, श्री राजू सिंगाडे मा. महापौर कोल्हापूर या मान्यवरांच्या हस्ते, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन होत असून कौतुक करीत आहेत.