कोल्हापुरातील तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना निपाणी शहरात घडली आहे. मूळचा कोल्हापूरचा राहणारा अभिषेक हा निपाणी येथे आपल्या आईसोबत छोट्या गल्लीत राहत होता . तसेच तो एका खासगी चित्रपटगृहात काम करत होता.
मात्र काल दुपारी एकच्या सुमारास अभिषेकची त्याच्या घरी हत्या करण्यात आली. यावेळी ही माहिती निपाणी शहर पोलीस स्थानकाला देण्यात आली यावेळी त्यांनी घटना स्थानी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी चौकशी केल्यांनतर प्राथमिक तपासात पैशांचा वादात हा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला .याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. तसेच निपाणी पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.