गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर येथील समर्थ नगर मधील श्री एकदंत युवक मंडळ आणि दुर्गाशक्ती महिला मंडळ यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जवळपास या स्पर्धेत 100 हून अधिक लहान मुला मुलींनी सहभाग घेतला असून सदर स्पर्धा 2 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता एकदंत सांस्कृतिक भवन विनायक मार्ग समर्थ नगर येथे पार पडली.
यावेळी लहान मुलांमुलींसाठी पारंपारिक वेशभूषा स्पर्धा ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यावर आधारित प्रश्नमंजुषा तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक ओमकार मेवाड सुधाकर कडोलकर नागेश गावडे निर्मल कणेरी आप्पाजी कुंडेकर लक्ष्मण कुंडेकर मल्लाप्पा सुळगेकर अनंत गावडे माला कणेरी मंगल गावडे शांता लोहार सावित्री कणेरी आनंद देशपांडे पांडुरंग कुलकर्णी यांच्यासह गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.