श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या गेले संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला. यानिमित्त फाल्गुन अमावस्येला धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. पकडल्या गेल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत संभाजी महाराजांना त्या क्रूरकर्मा औरंगजेबाने फंदफितुरी ने पकडून अनेक नरक यातना, यमयातना दिल्या. पायाच्या टाचेपासून खांद्यापर्यंत कुर्हाडीने तुकडे तुकडे करून अत्यंत हाल हाल करून संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. त्यांची अंत्ययात्रा ही निघाली नाही. इतके दाहक आणि दिव्य बलिदान त्यांचे आहे. हे त्यांचे बलिदान अखंड हिंदू समाजासाठी आहे. याची जाणीव प्रत्येक हिंदू समाजाला रहावी म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुकपदयात्रा काढली जाते. आणि संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी दिला जातो. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विधिवत पूजन करून बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांचाहस्ते ज्वालेच्या मुकपदयात्रेला सुरुवात झाली. ही मुकपदयात्रा एस पी एम रोड, शनी मंदिर, हेमू कलानी चौक, टिळक चौक येथून निघून रामलिंग खिंड मार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे पोहचली. यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला विविध तऱ्हेचा अभिषेक घालण्यात आला. जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते मूर्तीला पुष्पहार अर्पण करून, संभाजी महाराजांची प्रतिकात्मक चिता रचून, मंत्रोच्चार करून विधिवत पूजन करण्यात आले. तसेच त्यांना मंत्राग्नी देऊन त्यांच्या प्रतीकात्मक चितेचे दहन करण्यात आले. या चितेला अग्नी देण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथून ज्वाला प्रज्वलित करून आणली होती. यावेळी म.ए.युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उत्तर चे आमदार अनिल बेनके तसेच बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर यांनी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जिल्हाप्रमुख श्री किरण गावडे यांनी धारकर्यांना मार्गदर्शन केले. वक्ते म्हणून कणबर्गी विभाग प्रमुख हिरामनी मुचंडीकर यांनी धर्मवीर बलिदान का पाळावा तसेच आजचा हिंदुसमाज या विषयावर सखोल मार्गदर्शन करून उपस्थित शिवभक्तांना भारावून सोडले. गजानन निलजकर यांनी सर्व धारकर्यांना भारत मातेची प्रतिज्ञा देण्यात आली. या संपूर्ण विधीचे पौराहित्य छत्रे गुरुजी यांनी केले. शेवटी ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. यावर्षी तब्बल 110 विभागात ज्वाला देण्यात आली. यात संपूर्ण तालुका तसेच सिंधुदुर्ग, डिचोली या भागात ही ज्वाला पोहचली. यावेळी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील अजित जाधव, पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले, किरण बडवणाचे, अंकुश केसरकर, अतुल केसरकर, प्रमोद चौगुले, चंद्रशेखर चौगुले, उदित रेगे, अभिजित अष्टेकर, गजानन पाटील, गजानन पवार,अमोल केसरकर, वैभव धमनेकर, युवराज पाटील, भास्कर पाटील, व्यंकटेश पाटील, छत्रे गुरुजी, मोहन ओक, चैतन्य छत्रे, शंकर भातखंडे, जोतिबा चोपडे,शुभम मोरे, अभिषेक निलजकर,सागर मुतकेकर, अमित पेडणेकर,विजय कुंटे, प्रमिला पाटील,सुलोचना शिनोळकर, गौरी गवाने,वैष्णवी धामनेकर, मैथिली अंगोळकर तसेच शेकडो धारकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.