*अगसगे येथील मराठी शाळेत युवा समितीच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप*
अगसगे येथील मराठी प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष मोहन रेडेकर होते,
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास चालना दिली, पाचवी च्या विद्यार्थिनी ईश्वस्तवन सादर केले, त्यानंतर युवा समितीचे खजिनदार मनोहर हुंदरे यांनी मनोगत मांडताना म्हणाले की सीमाभागातील मराठी शाळां या मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा पाया आहेत आणि त्या शाळा जतन करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य असून आणि आम्ही खारीचा वाटा म्हणून युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही सीमाभागातील प्रत्येक मराठी शाळेत आम्ही शैक्षणिक साहित्य पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत असे सांगितले या बरोबरच युवा समिती च्या इतर सामाजिक उपक्रमा बद्दल माहिती दिली तसेच सातवीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी युवा समितीच्या वतीनं शुभेच्छा दिल्या। वाय के पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना “मातृभाषेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी कधी शिक्षणात कमी पडत नाहीत, सर्वांनी मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य द्यावे असे आवाहन करीत युवा समिती चा शैक्षणिक उपक्रमाचा या निमित्ताने गौरव केला।
मुख्याध्यापक के एल पाटील यांनी देखील युवा समितीच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली.
यानंतर आभार प्रदर्शन एस डी शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन के एल पाटील यांनी केले,
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वाय के पाटील, उपाध्यक्षा सौ सविता रेडेकर,यल्लाप्पा कंग्राळकर, लक्ष्मण कंग्राळकर, विनायक रेडेकर, भैरु डोणकरी, महेश रेडेकर,मालू केदार, आनंदी सनदी, सरिता कंग्राळकर, तसेच शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते