देसुर येथे प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
बेळगाव : तालुक्यातील देसुर गावामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मंदिर कमिटीच्या वतीने पाहुण्यांचा शाल व श्रीफळ तसेच हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
भाजप एसी मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य पृथ्वी सिंग व माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल ,पृथ्वीसिंग फाऊंडेशनचे संचालक जस्विर सिंग यांच्या हस्ते मंदिरचे फीत कापून उद्घाटन करून मान्यवरांच्या हस्ते प्रसाद वाटप करून महाप्रसादाला चालना देण्यात आली.
याप्रसंगी चेतन पाटील ,रमेश पाटील ,बापू ,संकेत पाटील, यल्लाप्पा सावंत ,विनोद पाटील, रणजित पोटे यांच्यासह इतर श्रीराम भक्त व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.