खासगी जय किसान भाजी मार्केट बंद करा या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले.
अलीकडेच सुरू करण्यात आलेले जय किसान भाजी मार्केट हे अनधिकृत आहे.त्याला परवानगी नाही.त्यामुळे हे अनधिकृत खासगी भाजी मार्केट बंद करावे या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी व्यापाऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून आंदोलन छेडले आहे.सोमवारी भाजी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले.खासगी जय किसान भाजी मार्केट बंद करा नाही तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी आंदोलनकर्त्या भाजी व्यापाऱ्यांनी केली.आम्ही लाखो रुपये गुंतवून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी व्यवसाय करण्यासाठी दुकाने घेतली आहेत.आमचा व्यापार खासगी भाजी मार्केट मुळे ठप्प झाला आहे.त्यामुळे आम्ही आर्थिक अडचणीत आलो असून आम्हाला न्याय द्या अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.