हिजाब बंदीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात कडेकोट पोलीस बंदोबस्तात दहावीच्या परीक्षेला प्रारंभ
कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या हिजाब बंदीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात कडेकोट पोलीस बंदोबस्तात सोमवार पासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला.परीक्षा केंद्रात हिजा ब आणि केसरी शाल घालून येण्यास परवानगी नाही.परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर पोलीस आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी तपासणीसाठी उपस्थित होते.परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे थर्मल चेकिंग करून आणि सॅनिटायजर देवून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी शहरातील सरदार हायस्कूल येथील परीक्षा केंद्राला भेट देवून पाहणी केली आणि विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देवून शुभेच्छा दिल्या.परीक्षा केंद्रात एका खोलीत वीस विद्यार्थ्यांची परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.सामाजिक अंतर पाळून परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.बेळगाव जिल्ह्यात २९६ परीक्षा केंद्रे आहेत.बेळगाव जिल्ह्यातून ७८५८७ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत.