*बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि व्यवसायभिमुखता हीच वंध्यत्वाची कारणे: डॉ. ग्रीष्मा गिजरे*
बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि व्यवसायभिमुखता हीच वंध्यत्वाची कारणे आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाच्या राहणीमानात आहारामध्ये बदल झाला. दिवसेंदिवस प्रदूषनात वाढ होत आहे. आजकाल तरुण तरुणी व्यवसायाभिमुख बनल्या आहेत. ही वंध्यत्वाची कारणे आहेत असे प्रतिपादन बेळगावच्या युवा स्त्री रोग तज्ञ डॉ. ग्रीष्मा गिजरे यांनी
तारांगण,अ.भा.मराठी साहित्य परिषद आणि डॉ.गिजरे यांचे जननी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.शकुंतला गिजरे सभागृहात कर्तृत्ववान अशा दहा महिलांच्या सन्मानाचा कौतुक सोहळा व वाढती वंध्यत्वाची कारणे व उपचार या विषयावर व्याख्यानात केले.
त्या पुढे म्हणाल्या की,
पती-पत्नीमध्ये वंध्यत्वाची समस्या असेल तर फक्त पत्नीलाच दोष न देता दोघांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार पद्धतीचा अवलंब केल्यास वंध्यत्वावर मात होवू शकते.
होते .कार्यक्रमात व्यासपिठावर प्रमुख पाहुण्या डॉ.मंजुषा गिजरे ,अध्यक्ष मीना खानोलकर, वक्त्या डॉ.ग्रिष्मा गिजरे ( डॉ.मंजूषा गिजरे यांच्या स्नुषा) व तारांगणच्या संचालिका अरुणा गोजेपाटील आदी मान्यवर उपस्थीत होते.
होते.आजकालच्या धावपळीच्या व तणावग्रस्त जीवनात महिलांसाठी वंध्यत्व हा आजार वाढीस लागला आहे.त्यामागची काही कारणे,मासिक पाळीची अनिश्चितता, हार्मोन्स बैलन्स,गर्भधारणेसाठीची विविध उपाययोजना आणि त्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांना भेटणे किती गरजेचे आहे हे डॉ.ग्रिष्मा गिजरे यांनी अगदी मोजक्या सहज,सोप्या भाषेत व्याख्यानात सांगितले. नक्की करता येऊ शकते असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ.गिजरे यांच्या तिसऱ्या पिढीच्या व्याख्यानाचा लाभ घेता आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुणे, अध्यक्ष यांच्या हस्ते दीपप्रज्वलन पार पडले.स्वागतगीत रुक्मिणी निलजकर आणि सहकारी यांनी सादर केले. व सावित्री बाई फुले महिला मंडळ यांनी सावित्रीबाईंवरील ओव्या सादर केल्या.
व्यासपिठावरील सर्व मान्यवरांचा छोटे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.
दुसऱ्या सत्रात दहा कर्तृत्ववान महिला व त्यांचे कार्य सहज सोप्या भाषेत लेखाद्वारे शब्दबद्ध करणार्या दहा लेखिका या सर्वांचा सन्मान व्यासपिठावर करण्यात आला. तारांगणच्या संचालिका अरुणा गोजे पाटील यांच्या संकल्पनेतुन हा कौतुक सोहळा दिमाखात पार पडला.प्रथमच एका स्त्री कडुन एवढ्या महिलांचे कर्तुत्व समाजासमोर उजेडात आणून त्यांचा योग्य तो सन्मान करुन त्यांचे यथोचित कौतुक करण्याचा अनोखा योग अरुणा ताईंनी उत्साहाने जुळवून आणला.मातीशी नात सांगणार्या रुक्मिणी निलजकर-लेखिका – -अस्मिता आळतेकर , वटवृक्षाला भक्कम पणे आधार देणार्या सरोज पाटील- लेखिका-मंजूषा पाटील, स्वावलंबनाचे धडे देणार्या सींथिया फर्नांडिस -लेखिका-लक्ष्मी पोतदार, सरस्वतीची ज्योत ज्योती बामणे – लेखिका-शीतल पाटील , प्रतिकूल परिस्थितीतील यशस्विनी श्रद्धा हेरेकर -लेखिका-अपर्णा पाटील , साधी राहणी उच्च विचारसरणी -लता पावशे -लेखिका – अरुणा गोजेपाटील हरहुन्नरी व्यक्तिमत्व मनिषा नाडगौडा -लेखिका – रोशनी हुंदरे , बेळगावची सोनेरी जलपरी – सिमरन -लेखक – सुर्यकांत हिंडलगेकर , संघर्षाचे नाव- सुधा भातकांडे – लेखिका – सीमा मुरकुटे , चिमुकल्यांच्या स्वप्नांना पंख देणार्या – सुरेखा पाटील – लेखिका – विजया उरणकर , विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव झटणार्या – जयश्री पाटील – लेखिका – स्मिता किल्लेकर . अशा दहा महिला व त्यांच्या लेखिका या सर्वांचा सन्मान याठिकाणी करण्यात आला. स्वेटर डिझायनर च्याआशा पत्रावळी यांनी विणकाम क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यातून दैदिप्यमान दैदिप्यमान यश मिळवले आहे त्यामुळे त्यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यामुळे त्यांचाही सन्मान करण्यात आला . सोन पावलांच्या या वाटा कौतुकाच्या वर्षावात अधिकच तेजाळल्या. कार्यक्रमाचे आयोजनामध्ये नेत्रा मेनसे, जयश्री दिवटे,सविता वेसने,सुधा माणगावकर, स्मिता चिंचणीकर यांनी परिश्रम घेतले. शीतल पाटील यांनी सूत्रसंचालन केले