सकल मराठा समाजाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
बेळगाव : विखुरलेल्या आणि प्रगतीपासून दूर गेलेल्या मराठा समाजाला संघटित करून राज्यात वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या मध्यवर्ती कार्यालय उद्घाटनाच्या बैठकीत करण्यात सीमा सत्याग्रही रामा आला . शिंदोळकर यांच्या हस्ते जत्तीमठ येथे शुक्रवारी कार्यालयाचे उद्घाटन झाले . एक मराठा लाख मराठा यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जत्तीमठ येथे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले . शैक्षणिक मदतीसाठी पुढाकार घेणे , मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या शेती संपादनाला संघटित विरोध करणे , शिक्षण आणि रोजगारासाठी २ अ प्रवर्गात राखीवता मिळवणे , व्यवसायासाठी मदत उभारणे , वकील , डॉक्टरांची संघटना निर्माण करणे , दर महिन्याला बैठक घेणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली . किरण जाधव , गुणवंत पाटील , माजी महापौर शिवाजी सुंठकर , जिल्हा पंचायत माजी सदस्य रमेश गोरल , डॉय सोनाली सरनोबत , महादेव पाटील , मनोहर संताजी , सुनील जाधव आदींनी मनोगत व्यक्त करून मराठा समाजाला एकसंघ करण्याचा निर्धार नगरसेविका वैशाली भातकांडे,माजी महापौर विजय मोरे,नगरसेवक मनोहर हलगे पलंगे , राजू बिर्जे , विजय चंद्रकांत कोंडुसकर , संजय अनिल पाटील , आदी उपस्थित होते .