भारतमातेच्या शूर सुपुत्रांना विनम्र अभिवादन
शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल शनैश्वर मंदिर जवळील भगतसिंग चौक येथे उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली .
अनिल बेनके यांनी भारत मातीसाठी बलिदान दिलेल्या या वीर शहिदां बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगीरणजीत पाटील, देवस्थान समिती सदस्य, रिक्षा मित्र मंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते .