सुहासिनी महिला मंडळाचा महिला साजरा
बेळगाव: पटवर्धन ले आऊट वडगाव येथील सुहासिनी महिला मंडळाचा महिला दिन नुकताच जल्लोषात पार पडला. यावेळी महिला मंडळाने नेहमीप्रमाणे सामाजिक उपक्रम हाती घेतला होता. बेळगावचे काही महिला उद्योजकांना त्यांनी घरगुती तयार केलेल्या उत्पादनांची ओळख व्हावी यासाठी स्टॉलची मंडळाने सोय करून दिली होती. यामुळे महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करणे खूप सोयीचे झाले .
मंडळातील सदस्यांसाठी शारीरिक व बौद्धिक खेळाचे आयोजन केले होते .महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन खेळाचा आनंद लुटला ज्येष्ठ महिलांनी पण बक्षिसे मिळवली. तसेच या सोहळ्यात बाल गोपाळांनी सुद्धा सहभाग घेतला होता. कार्यक्रमाची सांगता अल्पोहाराने झाले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या करण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षा नंदिन चौगुले ,सदस्या वृंदा तडकोड, विद्या तोपिंगकट्टी, वनिता बिर्जे, ऐश्वर्या पाटील, अर्पणा भंडारी, विद्या जाजू,आरती वेर्णेकर,आदित्य शिंदे यांचे विशेष परिश्रम लाभले.