महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तर्फे हुंचेंनहट्टी येथील मराठी पूर्ण प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले.
यावेळी युवा समिती चे सागर कणबरकर यांनी युवा समिती च्या उपक्रमाची माहिती दिली आणि शाळेच्या पटसंख्या वाढी बद्दल शिक्षक घेतलेल्या परिश्रमाचे विशेष कौतुक केले तर साईनाथ शिरोडकर यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या परिसरातील बिहारी, तेलगू आणि बंगाली भाषिक कामगार वर्गाच्या मुलांना मराठी माध्यमात प्रवेश देऊन त्याना मराठी मध्ये निष्णात केल्या बद्दल शिक्षक वर्गाचे कौतुक केले।
यावेळी शिक्षण प्रेमी श्री अभय प्रभू यांनी मनोगत व्यक्त करताना युवा समिती च्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी युवा समिती तर्फे नारायण मुचंडीकर, शिक्षण प्रेमी
श्री अभय प्रभू, वसंत तांबुळगुंडे, प्रल्हाद गोसावी तुकाराम मोहिते, गजानन वासुदेव, पुन्नाप्पा हुंबरवाडी. मयूरी मोहिते, वासंती तांबुळगुंडे, प्रभावती बस्तवाडकर, सुधा धामणेकर, रेखा मोहिते, अश्विनी मोहिते, मुख्याध्यापिका एम्. बी. कांबळे, आर के बागेवाडी, डी व्ही पाटणेकर व विद्यार्थी उपस्थित होते.