रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद सोडवून तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यात तातडीची बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा मागणीचे निवेदन बेळगाव बार असोसिएशनच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्रमोदी यांना दिले आहे .
अनेक दिवसांपेक्षा जास्त काळापासून रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरु आहे .त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, बांधकाम साहित्य, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत.आपल्या देशातील सर्व गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना सुखी जीवन जगण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शिवायकोविड-19 मुळे सर्व भारतीय त्रस्त आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या भारतीय सावरलेले नाहीत . आता पुन्हा रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले आहे .ज्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा परिणाम भारतीयांना भोगण्याची वेळ येणार आहे .त्यामुळे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी सर्व राष्ट्रांच्या नेत्यांमध्ये तातडीची बैठक घेणे योग्य आणि आवश्यक असल्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे भारतावर उपासमारीची वेळ येणार आहे .तसेच या युद्धामुळे सर्व किंमतीत भरमसाठ वाढ होत चालली आहे .त्यामुळे दोन राष्ट्रांमधील तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी आणि त्याद्वारे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरीत खबरदारीची पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी केली आहे .