12 ते 14 वर्षीय मुलांसाठी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन
बेळगाव : जिल्हा प्रशासन ,जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12 ते 14 वर्षीय मुलांसाठी काब्रिव्हक्स लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आज येथील जिल्हा वैद्यकीय कॉलेजमध्ये करण्यात आले .
यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ ,आरोग्य अधिकारी एस व्ही मुन्याळ, वैद्यकीय अधीक्षक अण्णासाहेब पाटील ,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उदघाटन समारंभात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासह 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी प्रेक्लीनिकल लस मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा वैद्यकीय विज्ञान संस्थेचे सदस्य जिल्हा पंचायत जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे संचालक तसेच नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.