वकिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
न्यायालय आवारात समुदाय भवन हॉलमध्ये काल दिनांक 15 मार्च रोजी बेळगाव बार असोसिएशन आणि गणेशपूर येथील एस जी बी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिर सकाळी साडेदहा ते पाच या पार पडले असून या शिबिरात अनेक वकिलांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली.
याप्रसंगी आयुर्वेदिक कॉलेज चे एमडी डॉक्टर अधिवेश अराकेरी डॉक्टर अनिल कुरंगी डॉक्टर अश्वत डॉक्टर अश्विनी यांच्यासह एस बी जी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मधील प्राध्यापक डॉक्टर तसेच हॉस्पिटल मधील परिचारिका डॉक्टर यांनी जवळपास तीनशे वकीलांची आरोग्य तपासणी केली.
यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे प्रभू यतनटी, सचिन शिवन्नावर सुधीर चव्हाण गिरीराज पाटील बंटी कपाही यांच्यासह बेळगाव बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.