सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांना मदत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन शिक्षण घेण्यासाठी ज्या मूलभूत आवश्यकता आहेत त्या पुरविल्या जात आहे. अशाच प्रकारे येथील खंजर गल्लीतील सरकारी उर्दु मुलींच्या शाळेची पाहणी केपीसीसी कार्याध्यक्ष आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी भेट देऊन पाहणी केली आणि शाळेत कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेतल्या
प्रारंभी सतीश जारकीहोळी यांचा शाळेचे मुख्याध्यापक त्यांनी शालू घालून सन्मान केला. त्यानंतर यांनी शाळेतील प्रत्येक वर्गखोलीत जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या आहेत हे जाणून त्या समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.
सतीश फाउंडेशन यांच्या वतीने शाळेमध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांना पुरविला जात आहेत. बेंच, स्मार्ट बोर्ड, मैदान, शौचालय , वर्गखोल्या यासह आदीची पाहणी करून विद्यार्थ्यांना सर्व त्या सुविधा पुरविल्या जात आल्याची माहिती यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष आणि यमकनमर्डी चे आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे