भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या संयुक्त लष्करी कवायतीचा समारोप मराठा लाईट इन्फ ट्री रेजिमेंटल सेंटर येथे पार पडला. दि.२७ फेब्रुवारी ते १० मार्च कालावधीत या संयुक्त लष्करी कवायतीचे आयोजन करण्यात आले होते.
मेजर जनरल भवनेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.भारत आणि जपान सैन्याच्या तुकडीकडून भवनेश कुमार आणि जपान लष्कराचे कर्नल रुचीनो बातो यांनी मानवंदना स्वीकारली.
या समारोप कार्यक्रमात जपान लष्कराचे कर्नल रुचीनो बातो यांनी भारतीय लष्कराला धन्यवाद दिले.संयुक्त लष्करी कवायत हा अविस्मरणीय अनुभव होता.दोन्ही सैन्याना नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या.जपान आणि भारत देशाचे संबंध या संयुक्त लष्करी कवायती मुळे अधिक दृढ होणार आहेत असे उद गार जपान लष्कराचे कर्नल
रुचीनो बातो यांनी काढले.
यशस्वी लष्करी संयुक्त कवायती बद्दल दोन्ही देशांच्या सैनिकांना धन्यवाद देतो.दोन्ही देशांच्या सैनिकांना बरेच शिकायला मिळाले.दोन्ही सैन्याना नवीन तंत्रज्ञान आणि माहिती मिळाली.भारत आणि जपान यांच्या मैत्रीचा सत्तर वर्षाचा इतिहास आहे.युद्धाभ्यास,शस्त्रास्त्रांची हाताळणी बरोबरच सांस्कृतिक देवाण घेवाण देखील संयुक्त कवायती दरम्यान झाली.भारत आणि जपान यांच्या मैत्रीला गौरवशाली इतिहास आहे.लोकशाहीची मूल्ये जपण्याचे आणि शांततेच संदेश दोन्ही देश देतात असे उद गार मेजर जनरल भव नेश कुमार यांनी समारोप कार्यक्रमात बोलताना काढले.
यावेळी भारत आणि जपान सैनिकांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर केली.भारतीय सैनिकांनी दांडपट्टा, ढाल तलवार,मल्लखांब आदींची प्रात्यक्षिके सादर केली.जपानी सैनिकांनी मार्शल आर्ट आणि कराटेची प्रात्यक्षिके सादर केली.