शाहूनगर मराठा कॉलनीत बोरवेल मंजूर
बेळगाव: शाहूनगर येथील मराठा कॉलनी मध्ये पिण्याची पाण्याची समस्या होत होती . स्थानिक रहिवासी आमदार आणि बेनके यांच्याकडे पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी केली होती. समस्या जाणून घेऊन उन्हाळ्यात या भागातील लोकांना समस्या होऊ नये यासाठी आमदार अनिल बेनके यांनी मराठा कॉलनी मध्ये बोरवेल मंजूर करून दिला.
बुधवारी नगरसेविका रेश्मा पाटील व ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील यांच्या हस्ते पूजन करून बोरवेल खुदाईला सुरुवात करण्यात आली..
मराठा कॉलनीतील पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल खुदाई मुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. याप्रसंगी शाहूनगर मराठा कॉलनीतील रहिवासी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.