युक्रेनमध्ये एम बी बी एस प्रथम वर्षात शिकणाऱ्या
ब्राह्मी मनोज पाटील या विद्यार्थिनीचे बेळगाव विमानतळावर आगमन झाले.यावेळी मंत्री उमेश कत्ती आणि बेळगावचे जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी तिचे स्वागत केले.ब्राह्मी ही बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी गावची आहे.
विमानतळाच्या बाहेर ब्राह्मीचे आई वडील आणि नातेवाईक वाट बघत थांबले होते.विमानतळाच्या बाहेर येताच ब्राह्मीने आपल्या आईला घट्ट मिठी मारून आपल्या अश्रूंना वाट करून दिली.यावेळी ब्राह्मीच्या नातेवाईकांना देखील आपले अश्रू आवरता आले नाहीत.
युक्रेनमध्ये परिस्थिती खूप गंभीर आहे .
किव येथील भारतीय दूतावासात आम्ही आश्रयाला होतो.आमच्या युनिव्हर्सिटीत शिकणारे सगळे विद्यार्थी भारतात सुखरूप परतले आहेत.फेब्रुवारी चोवीस तारखेला आमचे विमान होते पण बॉम्बिंग झाल्यामुळे आमचे विमान रद्द झाले आणि आमच्यावर दडपण आले. कि व हून आम्ही रेल्वेने सीमेपर्यंत आलो.रोमानिया सरकारने खूप चांगले सहकार्य केले. प्रत्येक मिनिटाला गोळीबार आणि बॉम्ब स्फोटाचा आवाज ऐकायला येतो असे ब्राह्मी हिने सांगितले.