या आहेत बेळगाव साठी च्या तरतुदी
मुख्यामंत्री बसवराज बोम्माई यांनी आपल्या पहिला अर्थसंकल्पीय अधिवेशनात बेळगाव साठी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
तसेच त्यांनी राज्याच्या विकासासाठी कोरोना सारख्या कठीण परिस्थितीतही आर्थिक विकासासाठी योगदान देण्याचा मानस ठेवला आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बेळगाव साठी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने किडवाई कॅसर सेंटर ,नव्या कृषी महाविद्यालयाचा समावेश आणि बहुमजली वसतिगृहाचा समावेश केलेला आहे. तसेच त्यांनी अर्थसंकल्पात बेळगावातील मराठा समाजाच्या विकासासाठी 40 कोटींची तरतूद केली आहे.
याआधी तत्कालीन मुख्यमंत्री बीएसए येडियुरप्पा यांनी मराठा समाजासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली होती. मात्र आता यामध्ये बदल करून ती 40 कोटी करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
कर्नाटक सरकार मराठा समाजाच्या विकासासाठी 40 कोटींची तरतूद करत असून कर्नाटक सरकार मराठा समाजाचा विकास करणार का ?का फक्त येडियुरप्पा सरकार सारखे तरतुदी करणार हे पाहणे बाकी आहे.
तसेच त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यासाठी महत्त्वाच्या तरतुदी केल्या असून त्या खालील प्रमाणे आहेत
*2000 जनावरांचे शेतकऱ्यांना होणार वितरण
*विधवा वेतन योजना अंतर्गत महिला अनुदानात वाढ तसेच लैंगिक अल्पसंख्यांकांसाठी मासिक पेन्शन मध्ये 800 कोटींची वाढ
*पेट्रोल डिझेल वरील विक्री कर वाढणार नाही
*राज्यभरात शंभर नवी प्रसूती रुग्णालय स्थापन होणार
*राज्यातील गो शाळांची संख्या वाढविण्यासाठी 50 कोटींची तरतूद
*रोजगार शिक्षण आणि सक्षमीकरण या तीन मूल्यांवर अधिक भर
*कृषी आणि सिंचनावर अधिक भर देत मेकेदाटू प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद
*बंगलोर शहरात दिल्लीतील दिल्ली मोहल्ला क्लीनिक च्या धर्तीवर होणार अवर क्लिनिक्स
*गोमाता सहकारी संघ स्थापनेची
*ॲसिड हल्ल्यातील महिला पेन्शन मध्ये तीन हजार पासून दहा हजार रुपयांपर्यंत वाढ
यासह अनेक तरतुदी केले असल्याचे त्यांनी या अर्थसंकल्पात घोषित केले.