समर्थ नगर विनायक मार्ग येथील श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ आणि श्री एकदंत युवक मंडळ यांच्या वतीने महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दुसर्या दिवशी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मार्केट पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुळशीगिरी आणि या भागातील नगरसेविका नेत्रावती भागवत यांच्या हस्ते शिवलिंगाला अभिषेक करून करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली .
यावेळी जवळपास या भागातील सुमारे बाराशे हून अधिक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेला महाप्रसाद यशस्वी करण्यासाठी येथील एकदंत युवक मंडळ आणि दुर्गाशक्ती महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले
शहापूर दानम्मा देवी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन
शहापूर येथील दानम्मा मंदिरात शिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी अहोरात्र देवाचा जागर करण्यात आला तसेच दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी शहापूर परिसरातील जवळपास हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.