बेळगाव प्रीमियम लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील मालिकावीरासाठी ॲडम्स ई बाईक पुरस्कर्ते
बेळगाव: युनियन जिमखाना आयोजित येत्या ५ मार्चपासून सुरू होणाऱ्या बेळगाव प्रीमियम टी २० क्रिकेट स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून स्पर्धेतील मालिकावीर यासाठी ॲडम्स इ बाईक पुरस्कर्ते म्हणून लाभली आहे. सदर स्पर्धेत ८ संघांनी भाग घेतला असून सामने साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार मिळवणाऱ्या क्रिकेटपटूला ॲडम्स इ बाईक बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत .पुरस्कर्ते अशोक तंगडी कंपनीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष शाहीन सय्यद यांचे युनियन जिमखाना सचिव प्रसन्ना सुनकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले .या प्रसंगी कंपनीचे वकील एफ. के .एन. कार्लेकर श्री के कार्लेकर ,मारुती चौगुले ,रोहित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.