कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत स्मार्ट क्लासचे उदघाटन
शाळेच्या चार भिंतीत देशाचं भवितव्य घडत असतं. शिक्षित, सुसंस्कृत, राष्ट्राभिमानी नागरिक तयार करण्याचा कारखाना म्हणजे शाळा.म्हणून शाळा ही शाळेसारखी असली पाहिजे.तेथील वातावरण विद्यार्थ्यांना पूरक व पोषक असणं किंबहूना तशी सोय करण ही शिक्षक व पालकांची संयुक्त जबाबदारी आहे.मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच मनोरंजनासह हसत खेळत शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आधुनिक साधनांची शाळेला तितकीच आवश्यकता असते.हाच उद्देश लक्षात घेऊन शिक्षक व देणगीदारांच्या सहकार्याने शाळेतील इयत्ता पहिलीच्या स्मार्ट कलासचे उदघाटन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक श्री.एम.वाय.तालुकर यांच्या हस्ते पार पडले.
त्याचबरोबर वर्गातील टीव्हीचे अनावरण श्री.शामलाल धनवार यांच्या हस्ते पार पडले.यावेळी महसूल अधिकारी सौ.प्रियांका पेटकर,श्री.प्रकाश गौंडाडकर,शाळेचे मुख्याध्यापक पी.एस.बिर्जे,शालेय शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.एम.वाय.तालुकर यांनी शाळेच्या प्रगतीबद्धल समाधान व्यक्त करून सर्व शिक्षकांचे कौतुक केले.सूत्रसंचालन श्री.उदय पाटील यांनी केले.