॥ श्री बसवाण्णा महादेव मंदिरात शिवरात्री निमीत्त महापूजा ॥
– शाहूनगर मधील बसवण्णा मंदिर कमीटीच्या वतिने महाशिवरात्री निमित महापूजेचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी मंदिर कमिटीच्या वतिने मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला .
या निमित्ताने सकाळी कमिटी अध्यक्ष श्रीकांत कदम उपाध्यक्ष श्री बामणे श्री अंगडी यांचेसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी मंदिरात बसवण्णा महादेवाचे विधीवत पूजन करून महापूजा करण्यात आली . त्यानंतर कमीटीच्या वतिने नगरसेविका रेश्मा पाटील , नगर सेवक श्रेयस नाकाडी , प्रमुख अतिथी गौरी बजंत्री, सीपीआय मंजूनाथ हिरेमठ व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रविण पाटील सह मंदिर कमिटीचे सर्व सदस्य व भाविक उपस्थित होते.