बेळगाव मध्ये अपुर्या वैद्यकीय सेवा देत असल्याने जिल्हा रुग्णालय वेगवेगळ्या अडचणीत सापडत होते. मात्र आता आमदार अनिल बेनके यांनी जातीने लक्ष घालून जिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने रुग्णावर त्वरित व वेळेवर उपचार होत आहे. त्यामुळे त्यांचा आज शेतकरी संघटना आणि कार्मिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला
पूर्वी कोणतेही ऑपरेशन एखाद्या खासगी हॉस्पिटलमध्ये करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर येत होती. मात्र आता जिल्हा रुग्णालयात लहान ते मोठी शस्त्रक्रिया करण्याकरिता आमदार अनिल बेनके यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानण्याकरिता कार्मिक संघटना आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच रुग्णांना आणि त्याच्या नातेवाइकांना सर्व त्या सुविधा उपलब्ध असल्याने अनेक जण खाजगी हॉस्पिटल ऐवजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास प्राधान्य देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी कार्मिक संघटना आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.